यांची 'फासले ऐसे भी होंगे' ही गजल 'हेमंत' रागात आहे हे आज समजले.

आपण दिलेल्या ओळींमधील एक शब्द चुकला आहे. हे सांगण्याचे अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे ज्या हेमंत रागाच्या 'भावनिक तीव्रता प्रदर्शित' करण्याच्या क्षमतेबद्दल आपण लिहीत आहात त्याच्या त्या क्षमतेला थोडेसे बोथट करणारा एक शब्द आपण घेतला आहेत.

'सामने बैठा था मेरे.. और वो मेरा न था' यातील 'औरच्या जागी आपण 'लेकीन' हा शब्द घेतला आहेत. (की पहिला!)

और - माझ्यासमोर ती (किंवा तो ) बसली / बसला होती / होता ... अन... तो 'माझा' नव्हता...! (ती माझी नव्हती)

लेकीन - माझ्यासमोर ती (किंवा तो ) बसली / बसला होती / होता... पण ... तो माझा नव्हता ...! (ती माझी नव्हती)

यातील 'और' या शब्दामध्ये :

१. ती आपली असावी असे फक्त कवीलाच वाटत असणे
२. 'इतके सगळे होऊनही, आज काय तर ती माझी नाहीच' असा
३. ' ती कधीच माझी नव्हती, मलाच वाटायचे, ...... आज उलगडा झाला' असा
४. ' माझ्यासमोर कायम माझे आपलेच बसायचे, आज बसलेली व्यक्ती चक्क माझी नव्हती' असा

असे अनेक भाव आहेत.

'लेकिन' हा शब्द त्या शेराला अत्यंत स्पष्ट करतो, जे कदाचित 'हेमंत' रागाला मान्य नसावे.

बाकीः आपले 'गायकी' याबाबत काय मत आहे ते जाणायचे आहे. माझ्यामते ती गजल 'आज मै रोया तो मेरे साथ वो रोया न था' हा गुलाम अली यांनी न गायलेला शेर सोडून सामान्य गजल असून ती गुलाम अलींच्या स्वरांतील आर्ततेमुळे जास्त खुलते.

-सविनय
बेफिकीर!