मी बराहा व्हर्जन ८ वापरतो आहे.
बराहाच्या क्विक एक्सपोर्टवर टिचकी मारली. सर्व फाइल बराहा पॅडमध्ये रूपांतरित झाली. मग कॉपी केले. मनोगत वर येऊन लिहिण्याच्या चौकटीत चिकटवले. पण सर्व त्या चौकटीच्या बाहेर चिकटले गेले. शिवाय जे चिकटवले गेले ते मराठीत नव्हते. मला वाटते ऍक्सी कोड १२९ ते २५५ मध्ये आले. मग ड्रॅग व ड्रॉप पद्धती वापरली. आता लिहिण्याच्या चौकटीत चिकटवले गेले. पण ते पूर्वीप्रमाणे मराठीत नव्हते. पण एक पाऊल पुढे पडले होते हेही नसे थोडके.
मग परत बराहात गेलो कॉपी पेस्ट स्पेशल करून ते सर्व मनोगत मध्ये चिकटवले. एकदम छान चिकटले व ते सुद्धा मराठीत. हुश्श केले. म्हटले एकदा वाचून पाहावे. त्यासाठी वाचून पाहा बटणावर टिचकी मारली. तर संदेश आला की, तुम्ही दुसरीकडून कॉपी करून चिकटवत असाल तर ते प्रथम नोटपॅड मध्ये चिकटवा व तेथून येथे चिकटवा. असे केले म्हणजे फाइलचा साइज कमी होतो. तसे करून पाहिले पण जमले नाही.
मग बराहातील मूळ फाइलमधला काही भागच कॉपी पेस्ट स्पेशल केला. अंदाजे ३ पाने. मग मात्र जमायला लागले. पण त्यामुळे भाग १, भाग २ असा प्रकार करायला लागला. माझ्या आडनावातील पहिले दोन शब्द प्रत्येक वेळेस यायलाच लागतात अशी मनाची समजूत घालून प्रयोग चालू ठेवला आहे. अजून दोन भाग चिकटवावयाचे राहिले आहेत.
खरे म्हणजे हे सगळे दिवाळी अंकात द्यावे असा विचार होता. पण दिवाळी अंकात भाषांतर हा विषय समाविष्ट केलेला नसल्यामुळे तो बेत रहित केला.