डिक्श्नरी.कॉम, केंब्रिज डिक्श्नरी, मेरिअम-वेब्स्टर पैकी केंब्रिज डिक्शनरीत सिमबायोसिस असा उच्चार लिहिलेला दिसतो. (पुढे
हे चिन्ह दिलेले आहे. बहुतेक अमेरिकन उच्चार असावा.) मेरियम आणि डिक्शनरी. कॉम ह्या ठिकाणी उच्चार ऐकल्यावर तो सिंबियोसिस असाच आहे असे वाटले. (बि मराठीतल्या दीर्घ बीसारखा वाटत नाही.)
पण एकुणात हल्ली उच्चार बदलण्याचा 'ट्रेंड' आहेसा वाटतो. बऱ्याच लोकांना,
'इक्स्टेम्परि'ऐवजी 'एक्स्टेम्पोऽर', 'इपिटमि'ऐवजी एपिटोम म्हणताना ऐकले
आहे.
खरे आहे. काळानुसार उच्चार बदलतात. अशा शब्दांतला शेवटचा इकार आता गळून पडला आहे असे वाटते. जाणकारांचे मत जाणून घ्यायला आवडेल.