असेउच्चारासाठी डॅनियल जोन्‍ज़चा उच्चारकोश वापरला तर मुख्य उच्चाराखेरीज अन्य दुय्यम उच्चारही एकाच ठिकाणी मिळतात. त्या कोशाप्रमाणे सिम्‍बियोसिस(मुख्य) व सिम्बायोसिस(दुय्यम) हे दोन्ही उच्चार दिले आहेत. सिमबायोसिस(x) आणि सिंबीयोसिस(x) हे दोनही उच्चार सापडले नाहीत.

फर्गसन असाच उच्चार तिथे मिळाला. फर्ग्‌सन किंवा फर्ग्युसन हे मिळाले नाहीत.  असले तरी, प्रत्येक परभाषिक शब्दाला एक स्वतंत्र मराठी उच्चार असतो.  त्या तत्त्वाप्रमाणे मराठीत लिहिता-बोलताना फर्ग्युसन प्रमाण समजावे. CHRIST चा उच्चार क्राइस्ट्‌ असला तरी आपण तसा केला तर एखाद्याला अर्थ समजणार नाही. यास्तव ख्रिस्त हाच प्रमाण मराठी उच्चार.

डॅनियल जोन्‍ज इक्स्टेम्परि आणि एक्स्टेम्‍परि हे दोन्ही पर्याय देतो.  मराठीत उच्चार करताना आणि लिहिताना शेवटचा ईकार दीर्घ काढणे भाग आहे. तसेच इपिटमि आणि एपिटमि बद्दल.