(१) जाहिरात बघितली. आई मुलाला काही तरी खेळवत न्हाऊ घालते आहे एवढंच त्यातून कळलं. बाबर का बेटा इ. इ. चा जाहिरातीशी काही संबंध वाटला नाही. ते शब्दही मला पटले नाहीत.

(२) अनेक तथाकथित 'विदेशी कंपन्या' भारतात व्यवसाय करतात, उत्पादन करतात आणि सरकारला (भारतीय कंपन्यांप्रमाणेच) विविध कर भरतात. मग त्यांचा गुन्हा काय? फक्त उरलेला नफा त्यांच्यातल्या परदेशी भागधारकांकडे (त्या भागांच्या प्रमाणात) जातो हा? यांमुळे भारतीय सरकारला पैसे मिळतात (जे देशासाठी / विकासासाठी / सुविधांसाटी वापरले जाऊ शकतात.), अनेकजणांना नोकऱ्या मिळतात हे सगळं का दुर्लक्षायचं?

टाटांनी टेटले, कोरस, जाग्वार इ. कंपन्या विकत घेतल्या; हे जर आपल्याला (इतर देशांनी चालवून घ्यायला) हवं असेल, तर भारतातही परदेशी कंपन्यांचा माल येणं, कंपन्या (परदेशी कंपन्यांना) विकल्या जाणं क्रमप्राप्तच आहे.

- कुमार