मेट्रिक टनांच्या आकड्यांत एक अनावश्यक मोकळी जागा, दशांश चिन्हानंतर आली आहे. असे किरकोळ टंकनदोष लेखात बरेच आहेत. पण एवढा मोठा तांत्रिक लेख लिहायचा म्हटला की ज्या थोड्या त्रुटी राहून जातात, त्या फक्त दुसऱ्यालाच दिसतात.

उदाहरणार्थः सुरुवात, सुरुवातीस, त्रिभुज, ध्रुवीय, आणखी, द्वि‌, द्रावण, ठरलेला, अणुस्रोत, हिंदमाता, ऋतुमान वगैरे शब्दांचे टंकन सदोष आहे. ध्रुवीत तापमान उणे पन्‍नास‌ऐवजी नुसतेच ५० सेल्शस लिहिले गेले आहे.

एन्सेफलायटीस की एन्‍केफ़लायटिस? मला दुसरे लिखाण योग्य वाटते. (कदाचित बरोबर नसेलही.) तसेच एन्‍व्हा‍यरॉमेन्‍ट की एन्व्हिरॉ..?