त्यांच्या काळाशी, त्यांच्या विचारांशी आणि बुद्धीच्या एकूण आवाक्याशी साधर्म्य राखणारी नवी नाटके का बरे लिहीत नाहीत? त्यांना आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तिरेखा का बरे निर्माण करत नाहीत? त्यांना आवडेल आणि आपलेसे वाटेल, असे सादरीकरण का करत नाहीत?
विचारात टाकणारा प्रश्न आहे. माझ्या लहानपणी 'राजकन्या नीलमपरी', 'चिंतेत पडलेला राजा' इ. खरोखर त्या वयात अस्वस्थ करून करमणूक करणारी बालनाट्ये पाहण्याचे भाग्य मला मिळाले. त्यामानाने अलीकडे (१९७५-८०) दरम्यान रत्नाकर मतकऱ्यांची बालनाट्येही चांगली होती (नानाची टांग इ.) 'दुर्गा झाली गौरी' हेही निर्मितीच्या बाबतीत वरचढ होते.
बाकी साहित्याची काय अवस्था आहे सध्या?