नमस्कार,
पुढे मांडलेली मते हे माझे वैयक्तिक विचार आहेत. टीका करणे, ह्या हेतूने ते मांडलेले नाहीत, याची खात्री बाळगावी.
तुमचा हा लेख नक्कीच विचारांना चालना देणारा आहे.
आणि तोच विचार करताना मला पडलेले प्रश्न पुढीलप्रमाणे...
विचार जने झाले, एवढ्या कारणावरून ते कालबाह्य ठरू शकतात का?
सादरीकरण नक्कीच दर्जाहीन असू शकते, पण त्या मागचा उद्देश दर्जाहीन असू शकतो का?
टॉम आणि जेरी किंवा इतर कार्टून व्यक्तीरेखा पाल्याचे आदर्श होऊ शकतात का?
'राक्षस, देव, परी आदींचं आयुष्य हे च खरं आयुष्य' हा संस्कार पाल्यावर होणं कितपत योग्य आहे?
त्यांना मार्गदर्शक असं साहित्य उपलब्ध नाही, की ते आपण त्यांना उपलब्ध करून देत नाही?
आज कार्टून्सना 'सत्य' मानणारे आजचे पाल्य उद्या कितपत (दर्जेदार) साहित्य-निर्मिती करू शकतील?
मातीच्या गोळ्यासमोर आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तिरेखा असाव्यात, की आदर्श व्यक्तिरेखा असाव्यात?
सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती बदलली, म्हणून मुलांनी आईशी उद्धटपणाने बोलण्याचा आपण पुरस्कार करावा का?
सत्तर-ऐंशीच्या दशकातली आहेत, म्हणून (अति)आदर्श नाटकं गैर संस्कार करतात का?
जादुगार रघुवीर आणि सई परांजपे जर दर्जाहीन, तर मग आपल्यापुढेच कोणते पर्याय आहेत?
विनंतीवरून या प्रश्नांचा गैर अर्थ लावला जाऊ नये.
हे सगळं मांडणारा मी आजच्या तरुणपिढीचाच प्रतिनिधी आहे, जो माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतो.
त्यामुळे माझे विचार नक्कीच जुनाट ठरणार नाहीत, याची खात्री वाटते.
विचारप्रक्रिया योग्य दिशेने सुरू राहावी, हा च काय तो, या प्रतिक्रियेमागचा उद्देश.
आपला नम्र,
शेखर श. धूपकर