साधारण अडीच तीन वर्षांपूर्वी "बँकर टू द पूअर" हे पुस्तक मी वाचलं होत. मायक्रोलेंडिंग वापरून बांग्लादेशात अत्यंत तळागाळातल्या लोकांना व्यवसायासाठी पैसा उपलब्ध करून दिला युनुस यांनी. ते पुस्तक आणि त्यांचा प्रवास वाचून खूपच भारावून गेलो होतो (आपणही भारतात असं काहितरी चालू कराव एव्हढा..). मध्ये बँक ऑफ बरोडानी मध्यप्रदेशात मायक्रोलेंडिंग चालू केल्याच वाचलं होतं. त्याच पुढे काय झालं माहित नाही. व्यावसायिक बँका ह्या क्षेत्रात कितपत यशस्वी होतील ह्या बाबत शंकाच आहे. कारण, कर्जाच्या रकमेपेक्षा आणि त्यावर मिळणाऱ्या नफ्यापेक्षा व्यवस्थापनाचाच खर्च जास्त होईल.
विशेष टिपणीः ह्या लेखाचं प्रयोजन नाही कळालं.