साधारणपणे दोन्हीचा अर्थ एकच आहे, त्यात फारसा फरक नसावा.
प्रख्यात म्हणजे 'प्रकर्षेण ख्यातः' आणि विख्यात म्हणजे 'विशेषेण ख्यातः' अशी संस्कृत व्युत्पत्ती लक्षात घेतली, तर प्रख्यात म्हणजे नुसताच प्रसिद्ध असं म्हणावं लागेल, आणि विख्यात म्हणजे विशेष प्रसिद्ध किंवा शरद कोर्डे म्हणतात तसा विशिष्ट क्षेत्रात/ एखाद्या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध असा अर्थ होईल.
पण वापर करताना एवढ्या बारकाईने वापर केला जात नसावा. चू. भू. दे.घे.