परिच्हेद क्र ५ हा परि. ८ म्हणून पुन्हां आला आहे.
खालील उतारा पाहाः
साधारण संध्याकाळी ६ च्या सुमारास त्या उठल्या. घरात रमेश व शैला गप्पा मारत बसले होते. तेथे येऊन, " मी सर्वासाठी चहा करते " असे म्हणून स्वयंपाकघराकडे निघाल्या. व लगेच " आई ग " असे म्हणून तेथेच कोसळल्या.
म्हणजे वहिनी पहिल्या वेळीं जाग्या होत्या. झोंपेत वगैरे होत्या असा उल्लेख नाहीं. आतां खालील उतारा पाहा
या माहितीवरून सौ. वहिनींना " स्लिप ऍप्निया सिंड्रोम " असल्याचे निदान डॉक्टरने काढले.
लेखातील माहिती चुकीची वा असत्य असण्याची शक्यता नाहीं. परंतु तपशील नोंदवतांना वा टंकतांना कुठेंतरी चूक झालेली आहे. किंवा कालौघांत तपशील विसरायला होतें तसें झालें असेल.
या विषयावर मी एक माहितीपट पाहिला आहे. बऱ्याच वेळां असे विरळा आढळणारे आजार डॉक्टरांना ठाऊकच नसतात आणि यांत्रिकपणें तपासण्या केल्या जातात आणि औषधयोजना केली जाते. इथें पेशंटच्या सुदैवानें रोगनिदान बरोबर झालेलें आहे.
सुधीर कांदळकर.