चार-पाच पेक्षा जास्त वाटते आहे. समजा चार-पाच असले तरी आई स्वयंप्रेरणेने तिला काही शिकवत असेल तर काय हरकत आहे?

दुसरं म्हणजे हे गाणं म्हणत असताना आधी संपूर्ण ओळ आई म्हणते मात्र नंतर ती शेवटचे वाक्य मुलीला आपण काहीतरी घोकून घेत असल्यासारखे म्हणायला लावते,

आईः "हुमायून का?"

मुलगी (थोडा विचार करून/आठवून): "अकबर"

त्याचबरोबर ती मुलगीही आपण काहीतरी नवीन शिकत असल्यासारखे मध्ये मध्ये गाण्याच्या ओळींनुसार 'हुमायून?' आणि नंतर 'अकबर?' असं म्हणते. यावरून कशाची तरी उजळणी किंवा काही नवीन शिकवलं जात आहे हे पुरेसं स्पष्टं होतंय. त्यानंतर मी माझ्या वरच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे ती मुलगी शाळेत जाताना दाखवली आहे. मला हे घोकण्यात आणि शाळेत जाण्यात लॉजिक दिसत आहे. त्यामुळे पिअर्स आणि अकबर, बाबर आदिंचा मासूमपणा याचा काहीही संबंध नाही.

अवांतरः

चार पाच वर्षांच्या शाळेत जाणाऱ्या मुलीला सॅक, गणवेष एव्हढं सगळं असतं का? (ही चौकशी आहे) नसेल तर त्या मुलीचे वय जास्त असले पाहिजे असले वाटते.

धन्यवाद !