स्वतः ताण न घेतां तसेंच विद्यार्थ्या/विद्यार्थिनीवर न ओरडतां, याचा चांगला वस्तुपाठ या जाहिरातीत आहे. तपशील तितकासा महत्त्वाचा नाहीं. उत्तान हावभाव करणारें अनावृत्त स्त्रीशरीर न दाखवतां केलेली आंघोळीच्या साबणाची जाहिरात 'तशा' इतर जाहिरातींपेक्षां नक्कीच सरस आहे. दांत घासल्यावर कित्त्येक तास 'जंतुरोधन' करणार्या टूथपेस्टसारखे खोटे दावे न करणारी.
तसें पाहिलें तर आपल्या खिशातला पैसा परकीयांपेक्षां स्वकीयांनींच जास्त लाटला आहे. ब्रिटिश आपल्याला अडीचशें वर्षांत लुटूं शकले नव्हतें तेवढें स्वकीय उद्योगपतींनीं वस्तूंच्या किंमती वाढवून लुटलें आहे. मुंबईत बी एस ई एस ची रिलायन्स झाल्यावर वीज किती महाग झाली पाहा. तूरडाळीचें उदाहरण तर ताजें आहे. स्वीस बँकेत भारतीयांच्या नावावर कमी पैसा नाहीं.
सुधीर कांदळकर.