श्री. वाईकर,
पांढरे जिरे म्हणजे तेच जे आपण घरात रोजच्या स्वयंपाकात वापरतो.
बाजारात जिरे ३ प्रकारचे मिळते.
१)पांढरे जिरे - हे आपले रोजच्या वापरातले जिरे. याला पांढरे म्हणतात पण ते अगदी दूधासारखे पांढरे नसते तर 'काळे जिरे' या त्याच्या भावंडापेक्षा जरा 'उजळ' म्हणून पांढरे म्हणतात. साबुदाण्याच्या खिचडीत, कढीला फोडणीत, बटाट्याच्या भज्यांच्या पिठात वगैरे पाककृतीत आपण वापरतो. पंजाबी आणि गुजराथी समाज आमटीच्या फोडणीतही वापरतात. दक्षिण भारतीय जिरे घातलेले पाणी उकळून कोमट करून पितात. असे पाणी पाचक असते.
२) काळे जिरे - हे दिसायलाही काळेच असते. ते मसाल्यांमध्ये वापरले जाते. चव जरा (पांढऱ्या जिऱ्यापेक्षा) उग्र असते. त्यामुळे मसाल्यात जास्त खमंगपणा येतो.
३) शाही जिरे - हेही दिसायला काळे असते. आकाराने लांबीला, वरील दोन्ही जिऱ्यांपेक्षा, किंचित तोकडे असते. वास तीव्र आणि चव जरा कडवट असते. मोघलाई मसाल्यात, पुलाव - बिर्याणीत वापर करतात. पाकिस्तानी बहुतेक पाककृतीत हेच जिरे वापरतात. पदार्थाला किंचित 'जळकट' (युरोपिअन पाककृतीतील 'Smoked') चवीसाठी वापरतात.
सर्व प्रकारचे जिरे प्रकृतीला थंड असते.
धन्यवाद.