बालनाट्यान्मध्ये "ग्रिप्स" ची बालनाट्ये हा एक अतिशय सक्षम पर्याय आहे-ती कालानुरूप, सन्स्कारक्षम तर आहेतच, शिवाय उच्च निर्मितिमुल्ये आणि मनोरंजकता या बाबतीतही सरस आहेत. मध्यवर्ती संकल्पना अतिशय आकर्षक आहेत, आणि संगीतही उत्कृष्ट आहे."पहिल पान", "नको रे बाबा"ही नाटके मोठ्यान्नाही अंतर्मुख करतील अशी आहेत.
@ शेखर
चांगला पर्याय नाही म्हणून निकृष्ट गोष्टी मराठी प्रेक्षकाने किती दिवस सहन करायच्या? आणी आहे हेच गोड मानून घ्या, कारण तुमच्याकडे पर्याय नाही, हा अजब युक्तिवाद आहे!(आणि पर्याय नसतील तर निर्माण होतातः भा. रा. भागवतानंतर हॅरी पॉटर चा पर्याय उपलब्ध झालाच. मग मात्र तो मराठी नाही, मराठी मुले मराठी वाचत नाहीत, हा माझ्या मते शुद्ध कांगावा ठरतो. ) सन्स्कारक्षमतेचे कौतुक पालकान्ना ,मुलाची प्राथमिक गरज मनोरंजन हीच असते असे मला वाटते.(मनस्वी खूश झाली, ह्याचे हेच कारण नाही का?) तेव्हा मनोरंजकता आणि सन्स्कार ह्यांचा मिलाफ कसा घालायचा, हे मोठ्यान्नीच बघायचे! नाहीतर टॉम ऍण्ड जेरीच आदर्श होतील, ह्यात नवल ते काय?(आणि खरे तर गांधी, जीना आणि सावरकर ह्यांच्या वैचारिक भूमिकाच आम्हाला पेलवत नाहीत, तोवर त्यांना आदर्श काय बनवणार?)