बेफिकीर,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. 'काय सांगायचंय' हा तुमचा प्रश्न आवडला.
अनेक वेळा अनपेक्षितपणे विचित्र परिस्थितीतून जायला लागतं (चांगल्या किंवा वाईट). त्याकडे नंतर त्रयस्थपणे बघितलं की तिच्यातली गंमत आपल्याच नजरेला पडते. माझ्यावर आलेल्या प्रसंगासारखा प्रसंग मुद्दाम ओढवून आणलेला नव्हता (मी किंवा मला चुकीचं पत्र देणाऱ्यांनीही); मग त्याकडे थोडं गंमतीनं का बघू नये वळून? आणि त्यातले प्रासंगिक विनोद आणि त्या अनुषंगानं सुचलेले शाब्दिक विनोद जर कुणाला आनंद देणार असतील तर का सांगू नयेत? (आपणांस आनंद देणारी कविता दुसऱ्यांनाही आनंद देईल हे केशवसुतांचं वाक्य आठवलं.
पुलंनी 'म्हैस' लिहिताना तरी काय विचार केला असेल? (हे मी तुलना म्हणून नव्हे, आदर्श म्हणून म्हणतोय.)
अबुधाबीचे प्रवास हे मला 'ऑन अरायव्हल विसा' बद्दल निर्धास्त करण्यास कारणीभूत होते आणि त्या दोन्ही अनुभवांतही वर लिहिल्याप्रमाणे अनपेक्षित काहीतरी (चांगलं/वाईट) होतं. त्यामुळे मला ते कझाखस्तान प्रवासाच्या गोष्टीशी सुसंबद्ध वाटतं.
'लेख बहकलेला आहे' - हे तुमचं मत असू शकतं. मी त्याचा आदर करतो.
-कुमार