मीराताईंची युक्ती तुमच्या नावावर खपविल्याचे लक्षात आले होते पण दिलेला प्रतिसाद परत उघडून दुरुस्त कसा करायचा हे कळले नाही. ते कळवले तर बरे होईल.
पण झाले ते बरेच झाले. जे माझ्या मालकीचे आहे ते तर माझे आहेच पण दुसऱ्याचे जे आहे तेही माझे कसे होईल ही धडपड आजच्या स्पर्धेच्या युगात पदोपदी जाणवते. पण जे आपल्या मालकीचे नाही किंवा ज्यासाठी आपण कष्ट घेतलेले नाहीत ते कोणी आपल्याला देऊ केले तरीही ते नम्रपणे नाकारायचे हा तुमच्यातील गुण त्यामुळे माझ्या लक्षात आला. जे ज्याचे आहे ते त्याला पोहोचविण्याची जबाबदारी घेतल्याबद्दल धन्यवाद.