'दुर्गा झाली गौरी' हे लहानपणी मला अत्यंत आवडलेलं नाटक.

२-३ वर्षांपूर्वी घरातल्या ३-४ मुलांना (भाचे-पुतणे वगैरे बालमंडळी) सुट्टीत अगदी हौसेनं ते नाटक दाखवायला घेऊन गेले आणि प्रामाणिकपणानं सांगते - नाट्यगृहात त्यादिवशी मुलांनी अक्षरशः लाज आणली. मुलं अर्धा तासही त्या नाटकात रमली नाहीत.

आपल्या लहानपणी आपल्याला जे आवडत होतं ते आताच्या लहान पिढीलाही आवडेल असं नाही हा 'जनरेशन गॅप'चा पहिला नियम (आणि धडा) मी त्यादिवशी शिकले !!