बेफिकीर्साहेबांनीं म्हटल्याप्रमाणे शिवाजी महाराजांनीं राज्य निर्मितेचें म्हणजे शून्यातून राज्य निर्माण करण्याचें आव्हान होतें. महाराणा प्रतापला महाराणा उदय सिंग दुसरा याचें राज्य मिळालें. तयार सैन्य मिळालें.
म. प्रतापला २४ भाऊ आणि २९ भगिनी होत्या. त्यांच्याशीं त्याला संघर्ष करायला लागला कीं नाहीं ठाऊक नाहीं. महाराजांना मामाशीं संघर्ष करावा लागला. स्वराज्यस्थापनेबरोबरच त्यांनीं स्थानिकांत स्वराज्याची संकल्पना निर्माण केली, रुजवली आणि त्यांचें सैन्य उभें केलें. यावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा करिष्मा किती जबरदस्त होता हें दिसून येतें. याउलट महाराणा प्रतापला स्वकीयांचा फारसा पाठिंबा मिळाला नाहीं म्हणजे त्याचें व्यक्तिमत्त्व शिवाजी महाराजांच्या तुलनेंत तितकेंसें प्रभावी नव्हतें असा निष्कर्ष काढायला प्रत्यवाय नसावा.
दोघांची तुलना करतांना त्यांच्या शत्रूंचीही तुलना करावी लागेल. अकबर - प्रतापाचा शत्रू हा तुलनेनें मराठ्यांचा शत्रू औरंगजेबापेक्षां जास्त मुत्सद्दी, जास्त प्रबळ आणि जास्त धोकादायक होता. सेनापतींच्या कारभारांत त्यानें हस्तक्षेप केल्याचीं फारशीं उदाहरणें सांपडत नाहींत. अकबर स्वतः आघाडीवर गेल्याचें उदाहरण शोधावें लागेल. औरंगजेब मात्र प्रत्येकाच्या कारभारांत ढवळाढवळ करीत असे. राजारामाच्या पाठलागांत औरंगजेबाच्या रणनीतीचे कच्चे दुवे दिसून येतात. मोगल इतिहासकारांनीं लिहिल्याप्रमाणें अकबर हा सुस्वभावी वगैरे नव्हता. कश्मीरच्या महाराणीबद्दल (तिचें नांव विसरलों) अकबराला आकर्षण होतें जी त्याला कधींच मिळाली नाहीं. जोधाबाईशीं अकबरानें लग्न केलें. अकबर हा औरंगजेबाच्या तुलनेंत जास्त स्त्रीलोलुप होता. शत्रूंची तुलना करतांना किंचित विषयांतर क्रमप्राप्त.
भारतात इतिहासात मला तरी फक्त ह्या दोनच व्यक्ती श्रेष्ठ वाटतात
हें वाक्य मात्र खटकलें. महाराणी ताराबाई, पौरस, चंद्रगुप्त मौर्य, आर्य चाणक्य, चंद्रगुप्त विक्रमादित्य, सम्राट अशोक, माधवराव पेशवे, सवाई माधवराव, इंदिरा गांधी, नरसिंह राव, मनमोहनसिंग, हे कांही कमी श्रेष्ठ नव्हते.
सुधीर कांदळकर.