आता ५-६ वर्षांच्या मुलाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमाचा विषय निघाला आहे तेव्हा, मला असे वाटते की कदाचित दिल्ली/उत्तर प्रदेश साईडला बाबर-अकबर वगैरे शिकवतही असतील! आपल्या कडे कसे महाराष्ट्र, शिवाजी महाराज यांचे धडे प्राथमिक इतिहासात असतात, तसे त्यांच्या कडे तर मुघलांचीच राजवट होती नं! तेव्हा आपआपल्या भागाचा थोडा स्थानिक इतिहास तर अंतर्भूत व्हायलाच हवा. (विशेषतः स्टेट बोर्डात - सी बी एस ई त नाही!)

बाकी ही जाहीरात म्हणजे निव्वळ हसत खेळत उजळणी करण्याचा (आणि त्याला 'पिअर्स' ने कसा उत्साह येतो ते दाखविण्याचा) एक ड्रामा आहे या संजोप राव यांच्या मताशी सहमत... (बाकी निर्मात्याचा मूळ हेतू साध्य झाला किंवा नाही याबद्दल मी साशंकच आहे)