माझा मुद्दा आपल्याला नीट कळला नाही असे वाटते.. माझे म्हणणे एव्हढेच की एका सदस्याने एकाच दिवशी किती साहित्य प्रकाशीत करावे? कविता विभागात तर काही सदस्यांच्या अगदी एकाखाली एक चार-चार पाच-पाच कविता दिसतात! उद्या कोणी एकाखाली एक दहा कविता प्रकाशीत करेल ; त्याला काय करावे? लेखनाला उत्तेजन जरुर असावे, जरुर द्यावे, पण ही स्वतःला 'अती-प्रकाशीत' करण्याची प्रव्रूत्ती नसावी.. ( मला काय म्हणायचे आहे ते सांगण्यासाठी ड्रुपलचा अभ्यास करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.. मी ह्या साईटचा गेले चार-पाच वर्षे एंड युसर आहे, आणि ती किती इंटर- ऍक्टीव आहे हे नीट जाणतो).. धन्यवाद! प्रत्येक सदस्याने रोज फक्त एकच पोस्ट करावी, असा दंडक असावा.
-मानस६