आपण सवाई माधवरावांचा उल्लेख श्रेष्ठ व्यक्तींमध्ये केला आहे. मला हे थोडे वेगळे वाटले. कारण मी जे वाचले त्याप्रमाणे हा पेशवा  आपल्या वडिलांप्रमाणेच (नारायण राव) लहरी नि प्रशासनास अपात्र अशा गुणांनी मंडित होता. त्याने दोन वेळा आत्महत्येचा (शेवटचा यशस्वी) प्रयत्नही केला आहे. डॉ. अ. रा. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या नाना फडणवीसांच्या चरित्रात याच्यासंदर्भात नाना फडणवीसाचे "कारभार आता बालबुद्धीने चालतो" असे मत दिले आहे. कबू नावाच्या एका माकडाला झाडावर चढवून त्याला झाडाच्या तळाशी चारी बाजूंनी वाद्ये वाजवून व कोलाहल करून बिथरवून झाडावरून खाली पाडण्याचा अजब पोरखेळ याने केल्याचा उल्लेख त्या पुस्तकात सापडतो. नानांचे व या पेशव्याचे कधीच पटले नाही. तरीही आपणांजवळ काही वेगळी माहिती असल्यास जरूर द्यावी. ज्या योगे अभ्यासाला नवी दिशा मिळू शकेल