मंदिराच्या गाभाऱ्यात घुसताना दारातील कासवाला पायदळी तुडविणे अनिवार्य असते.

वरील उपमा चुकली की काय असे वाटते. कासवाला नमस्कार करून मग मंदिरात आपण शिरत असतो.

कासव हे एक प्रतीक आहे. कासव ज्याप्रमाणे आपली सर्व इंद्रिये आवरून घेते त्याप्रमाणे देवळाच्या गाभाऱ्यात जाताना आपला मीपणा व त्यातून निर्माण होणारे काम,क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर आवरून घेऊन मग देवळाच्या गाभाऱ्यात प्रवेश करायचा असतो असे समजले जाते. हे भान ठेवून जर कासवाला नमस्कार केला किंवा नुसती आठवण जरी केली तरी देवदर्शनाने मिळणाऱ्या आनंदाचा दर्जा उंचावतो असे म्हणतात.

त्यामुळे या वाक्याऐवजी असे वाक्य वाचायला जास्त बरे वाटले असते.

मंदिराच्या गाभाऱ्यात घुसताना दारातील कासवाला वंदन करावयाचे असते पण ही राजकारणी मंडळी त्या कासवाला पायदळी तुडवण्यातच धन्यता मानतात.

एक मात्र मान्य केले पाहिजे. आपण जर अतोनात गर्दीत देवदर्शन करायला गेलो तर मात्र कासव पायाखाली तुडवले जाण्याचीच शक्यता जास्त असते.