जाहिरात कोणती आहे ही महत्वाचे नाही. आनंददायी शिक्षण ही काळाची गरज आहे ,
मुलीला स्नान घालता घालता शिक्षण दिले जात आहे हे महत्त्वाचे.जाहिराती
मधील मुलीला इतिहास विषयात बाबर..असेल म्हणून जाहिरातीत त्याचा उल्लेख
असावा.
अगदीं खरें. बाबर क्रूर होता का? हा आणखी महत्त्वाचा प्रश्न. हुमायून तर आयुष्यभर हरत आणि पळतच होता. अकबराचे तर इतिहासांत (खरे असो वा खोटे) गोडवेच आहेत. पण ते कसेही असोत. रिकाम्या जागा भरा मध्यें हे प्रश्न येऊं शकतात. आणि आंघोळ करतां करतां एक मार्क मिळवायचा अभ्यास होतो हें महत्त्वाचे. मग तपशील कांहींही असो. इतिहास असो वा भूगोल. आमच्या चिरंजिवाला शिकवतांना त्याला कठीण वाटणाऱ्या उत्तरांत मीं वातरट वाक्यें घुसवून धमाल उडवली कीं त्याच्या बरोबर लक्षांत राहात असे.
सुधीर कांदळकर.