जनरेशन गॅपही पूर्वीं दहा पंधरा वर्षांनीं पडायची. आतां. तीही बहुधा पांचेक वर्षांत पडते. कालचा मोगली देखील आज कालबाह्य झाला आहे तिथें गौरीचें काय? शिवाय आतां चित्रवाणी, संगणक इ. माध्यमामुळें मुलांच्यां भावविश्वाच्या कक्षाही रंदावल्या आहेत.
मुळांत नाटक बहुधा वैचारिक, समाजप्रबोधनपर वा वास्तववादी असतें. हॅरी पॉटर, पिकाचू इ. पुढें नाटकांतल्या व्यक्तिरेखा मागासलेल्या वाटणारच.
तसेंच बालमन असो वा मोठ्यांचें मन. कोणालाही ओळखतां येत नाहीं. म्हणूनच कोणतेंही व्यापारी उत्पादन, नाटक, चित्रपट वा अगदीं निवडणुकीतील उमेदवार, केव्हां चालेल वा पडेल हें कोणीही सांगूं शकत नाहीं.
पैसा लावणारांनाहि यश हवें असतें, प्रयोग नको असतात. तयारीसाठीं कलावंतांनीं द्यायचा वेळ नको असतो. मग नवें कसे येईल? मग घ्या जुनीच गौरी. करा तेच जादूचे प्रयोग ढिसाळपणें. जे. के. रोलिंगसारखें यश विरळाच आढळतें.
सुधीर कांदळकर