१) नागपुरात 'साडभाऊ' व 'शालक' असे दोन शब्द ऐकले होते. साडभाऊ म्हणजे साडू व शालक म्हणजे बायकोचा भाऊ (साला या अर्थी) असेल काय?

२) सावत्र भाऊ किंवा बहीण : वडील एकच पण आई वेगळी असेल तर सावत्र हा शब्द वापरला जातो. तोच आई एकच पण वडील वेगळे असतील तरी वापरला जातो. पण मिरासदारांच्या एका कथेत आई एकच पण वडील वेगळे असणाऱ्या भावांचा उल्लेख 'अधल्याचे' भाऊ असा केला आहे. हे काहीसं इंग्रजीतील 'हाफ ब्रदर्स' या शब्दाशी मिळतं जुळतं वाटतं.

३) काही लोकांना खूप दुवे असलेलं नातंही जवळचं म्हणून सांगण्याची संवय असते. त्याचा एक गमतीदार मासला :  "सावत्र साडूचा चुलत नातू." (ह. घ्या).