मी "दुर्गा झाली गौरी" माझ्या लहानपणी म्हणजे साधारण ७वीत वगैरे असताना पाहिले होते. वीसेक वर्षांपूर्वी. मला ते तेव्हाही भलतेच कंटाळवाणे आणि पुढे काय होणार ते माहित असलेले असे वाटले होते. त्यातली काही समूहनृत्ये मात्र आवडली होती.
पण त्याचबरोबर मला असंख्य वेळा पाहूनही जंगलबुक- मोगली बघायला अतिशय मजा येत असे. प्रत्येकवेळी तो लागला की एकदा आम्ही पाहून येत असू.
शामची आई हे बाळबोध पुस्तकही तेव्हा माझे आवडते होते. तसेच फास्टर फेणे वगैरेही.
हल्लीचे बालपट - इंग्रजी - फाईंडिंग नीमो, लायन किंग वगैरे मला या वयातही (! ) आवडतात.
मला वाटते, सादरीकरण महत्त्वाचे आहे तसेच कथाही. ६, ७ वर्षांपर्यंतच्या बालांना नुसत्या सादरीकरणाच्या जोरावर गुंगवून ठेवणे शक्य आहे. पण त्यापुढे कथेचा, त्यातल्या कलाटण्यांचा विचार करणेही आवश्यक आहे.