दिराच्या बायकोला जाऊ म्हणतात.
ह्यावर शं ना नवऱ्यांच्या एका नाटकात गमतीदार संवाद आहे. (तपशीलाच्या नेमकेपणाबद्दल चू. भू. द्या. घ्या.)
रंगमंचावर नायक आणि त्याचा भाऊ दारात उभे असतात (भावाने आपले लग्न ठरवलेले आहे). आतून नायिका बाहेर येताना नवऱ्याला म्हणते, "अहो मला जाऊ द्या. "
त्यावर नवरा म्हणतो, "अग मी कसा तुला जाऊ देणार? आता अशोकच तुला 'जाऊ' देणार आहे!"
त्यावर नायिका म्हणते, "जाऊ? "
त्यावर नायक उत्तरतो, "हो. हो. जा ना! "