लळित येथे हे वाचायला मिळाले:
आकाश जांभळट काळं होत चाललेलं…घरी परतणाऱ्या सर्वच वाहानांचे आवाज एकच-एक गोळा होवून रस्ताभर साठून राहिलेले…तिचंही मन पिळून धावणारे सगळेच अश्रू डोळ्यांच्या कडांत साठून राहिलेले…खिडकीबाहेर लटकवलेली एकटीच एकटी जाईची वेल कित्तीतरी दिवस व्यायली नव्हती…आज तिला फुलं आली आणि “अय्या! कित्ती गोड!” असं तिच्या पिलांचं तोंडभरून कौतुक करणारी तिची मालकीण मात्र तोंड एवढं-एवढुस्सं करून कोपऱ्यात एकटीच एकटी हुंदके देत रडत राहिली! सकाळचा दिवस आंबत- आंबत, संपत आला; तसं तिला स्वत:चीच काळजी वाटत स्वत:ला आरशात पुन्हा पाहण्याची अनावर इच्छा पुन्हा उफाळून ...
पुढे वाचा. : …