बहुतेक नवरा - बायलोच्या संबंधांमध्ये लहान मुलगी अडथळा ठरत असावी (रात्री वारंवार जागे होण्याची सवय असावी). ती लेखकाजवळ चांगली राहते, खेळते हे लक्षात घेऊन नवरा बायकोने हुशारीने लेखकाला दोन तीन दिवस घरी रहायला - झोपायला बोलावून मुलगी त्याच्याजवळ झोपेल अशी व्यवस्था करून आपला कार्यभाग साधला. हे सर्व करताना लेखक झोपेत असल्याने त्याला समजणार नाही अशी नवरा बायकोची अपेक्षा असावी. पण लेखकाच्या निद्रानाशाच्या व्याधीमुळे दोघांचा डाव त्याला समजला. आपला डाव फसला हे लक्षात आल्यावरही बायकोने लेखकाला झोपेची गोळी देऊन "शांत झोपा" असा सल्ला देणे  हा निर्लज्जपणाचा कळस आहे. आपला असा वापर केल्याने लेखक संतप्त होणे साहजिक आहे.

नवरा बायकोच्या कृतीमध्ये मला मूर्खपणा जास्त दिसतो. जर एकांतच हवा होता लहान  मुलीला तिचे आजी, आत्या, काका, मामा, मावशी अश्या नातेवाईकांकडे दोन तीन दिवस पाठवता आले असते. लेखक खरोखर नीतीमान होता म्हणून. पण लहान मुलीला परक्या पुरुषासोबत झोपू देणे तितके योग्य नाही. दुसरे म्हणजे हे रात्री आपले कार्य साधताना  पार्टिशन पलिकडे लेखक जागा असू शकेल असा विचार मनात राहिला तर क्रियेचा आनंदही घेता येणार नाही. अर्थात त्या दोघांनी हे लक्षात न घेता मोकळेपणाने आनंद घेतलेला दिसतो.

पण शेवटी लेखकाचा असा वापर करून घेणे अनैतिक नक्कीच आहे असे वाटते.

अर्थात हे माझे स्पष्टीकरण झाले. लेखकाला काही वेगळे वाटले असेल तर त्याने सांगावे.

विनायक