सौरभशी सहमत आहे, अनेक अंगांनी एखाद्या विषयावर चर्चा होऊ शकते ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे हे.

अवांतर : जाहिरात, अंघोळ, साबण इ. इ. वरून एक किस्सा आठवला तो सांगतो.

माझ्या मित्राच्या भाचीची शाळेत परिसर-अभ्यास ह्या विषयाची लेखी परीक्षा होती. रिकाम्या जागा भरा मध्ये प्रश्न होता
१. अंघोळ ----------- लावून करावी.

तिनं उत्तर दिलं होतं

१. अंघोळ दार लावून करावी.

हा हा हा हा हा !!!