संजोप राव, सुधीर, शैलेश, मृदुला आणि कुमार

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

"प्यारा प्यारा ये समां" मी पण फक्त एक दोन वेळाच रेडिओवर ऐकले आहे. "लाल किला"मधली रफीने म्हटलेल्या बहादूरशहाच्या गझला मात्र बऱ्याच वेळा ऐकल्या आहेत. अशी गाणी ऐकल्यावर एस. एन त्रिपाठी यांच्याबद्दलचा वाढला. त्यांचे आणखी एक गाणे निगाहोंमें तुम हो हे पण तुम्हाला आवडेल.

शिरीष कणेकरांनी एकदा लिहिले होते " 'जोगियासे प्रीत किये' सारखी कताची गोड गाणी अजूनही विविध भारतीवर ऐकायला मिळतात. अनाउन्सरची नोकरी जायची लक्षणे आहेत. " त्याची आठवण झाली.

संगीतकार किशोरकुमारसाठी  लताने काही गाणी गायली आहेत का ते मुद्दाम बघितले, मिळाली नाहीत. तसेच रॉबिन बॅनर्जी, राम गांगुली यांचीही लताची गाणी मिळाली नाहीत.

विनायक