आपल्या प्रतिसादाचे शीर्षक वाचून "ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन।" या ज्ञानेश्वरांची उक्तीची आठवण झाली. ऐशी/ऐंशी शब्दखेळही मस्त.
विनायकराव, कुठून कुठून ही गाणी शोधून काढलीत?
यातल्या बऱ्याच सुंदर गाण्यांबद्दल आधी शिरीष कणेकर, इसाक मुजावर आणि माधव मोहोळकर यांनी लिहिलेले वाचले होते. उदा. १९७५ च्या सुमारास "रसरंग" साप्ताहिकाने लताच्या आवडत्या गाण्यांबद्दल वाचकांची मते मागवली होती आणि त्यावर एक विशेषांक प्रसिद्ध केला होता. त्यात कणेकर - मुजावरांनी उल्लेख केलेली अनेक गाणी पुढे आवर्जून ऐकली. कणेकरांचे अनिल बिस्वास, श्यामसुंदर, विनोद यांच्याबद्दलचे प्रेम प्रसिद्धच आहे. मोहोळकरांनी "प्यार की ये तलखियां" (क्र. ९) बद्दल लिहिले आहे" हे गाणे ज्याने एकदा ऐकले आहे तो ते कधीही विसरणार नाही".
१९८५ ते १९९१ मध्ये अनंत रेगे सारखा मित्र मिळाला ज्याच्याकडे बराच संग्रह होता आणि दुसऱ्याला ऐकवायची हौसही. त्यानंतर मात्र ही गाणी परत कुठे ऐकायला मिळेनात. गेल्या दोन तीन वर्षात यूट्यूबने क्रांती केली. आवडणारी बहुतेक सर्व गाणी यूट्यूबवर मिळतील अशी परिथिती झाली आहे. आणखी एक उत्तम संग्रह माझे मित्र प्रा. सुरजित सिंग यांच्या संकेतस्थळावर हिंदी मूव्हीज साँग्स आहे.
विनायक