विनायकपंत,

धन्यवाद - लता मंगेशकरनं किशोरकुमारच्या दिग्दर्शनाखाली गायलं नसेल असंच वाटलं होतं; पण तुमच्या उत्तरावरून खात्री झाली. (तुमच्या अभ्यासावरून तुम्ही त्यातले नाही असं आधीच म्हणतो. पण-) किशोरकुमार हा उत्तम संगीतकार आणि नट असूनही त्याचं नाव या क्षेत्रांतल्या (अनुक्रमे संगीत दिग्दर्शन आणि अभिनय) कलावंतांची नावं घेताना दुर्लक्षिलं जातं. 

राम गांगुली हे मला वाटतं राज कपूरचे शंकर-जयकिशनच्या आधीचे संगीतकार. 'जिया बेकरार है' हे लता मंगेशकरनं राज  कपूर (आणि शंकर जयकिशन) साठी ध्वनिमुद्रित केलेलं पहिलं गीत असं वाचलं होतं; त्यामुळे तिनं राम गांगुलींसाठी गायलं नसावं.

- कुमार