Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:
बऱ्याच ई-मेल कंपन्यांनी मेलमध्येच स्पॅम रोखण्याची सोय केली आहे. याबाबतीत जीमेल हे सर्वात उपयोगी आहे. ते इनबॉक्समध्ये आलेल्या मेलची चाळण लावून स्पॅम मेल वेगळ्याच फोल्डरमध्ये टाकते. त्यामुळे इनबॉक्स उघडला की चांगलेच मेल दिसतात. स्पॅममेल फोल्डरमधले मेल तीस दिवसांनी आपोआप काढून टाकले जातात. त्यामुळे तुम्ही तो फोल्डर उघडलाच नाहीत तरी चालेल. उघडायचा मोह झाला तर कोणताही मेल ओपन करू नका. याहूनेही अशीच सोय मेलमध्ये केली आहे. हॉटमेलमध्ये काही प्रमाणात स्पॅममेल इनबॉक्समध्ये राहते. ते न उघडताच काढून टाकावे.