अनुक्रमे माचिस (पानी पानी रे), आईना (आईना है मेरा चेहेरा - गायक लता-आशा-सुरेश वाडकर), सनम बेवफ़ा हे चित्रपट आठवले. ह्या संगीतकारांना लता मंगेशकरच्या आवाजानं (विशेषतः दोन जोड्यांना) काही काळ तरी प्रसिद्धी मिळवून दिली. 'चूडी मजा न देगी' (सनम बेवफा) हे बरेच दिवस सिबाका (बिनाका) गीतमालेत पहिल्या स्थानावर होतं. ही नावं शंभरी पूर्ण करायला उपयोगी पडतील! तो सुदिन येवो ही मनोमन प्रार्थना.
अन्नू मलिकचं गाणं आठवत नाहीये (कठिणच आहे म्हणा ते!.. पण त्याचा 'कालखंड' लक्षात घेत-) तिनं गायलं असावं.
गझलांच्या क्षेत्रात जगजीतसिंगबरोबर 'सज़दा'.
'नर्गिस' नावाचा बासू चक्रवर्तींचं संगीत असलेला एक चित्रपट येणार होता. त्यातली गाणी चांगली होती.
(नदीम-श्रवण साठी लता मंगेशकर गायल्याचं आठवत नाहीये. आशा भोसलेनं काही गाणी गायली आहेत.)
- कुमार
ता. क. ऐशीच्या मर्यादेमुळे हे झालं असावं. आपलं संपादन अत्युत्कृष्ट आहे; त्यावर टीका करणे हा माझा हेतू अजिबात नाहीये हे कृपया लक्षात घ्यावं.