आजच्या ईसकाळात हे वाचायला मिळाले.

ईसकाळातली मूळ बातमी :
मी मराठी आहे... हिंदीत बोलणार नाही! - महेश मांजरेकर
रविवार दि. ४ ऑक्टो. २००९

.... महेश मांजरेकर यांनी पुन्हा एकदा आपला मराठी बाणा दाखविला आहे. मी मराठी आहे... मला हिंदी येत नाही. त्यामुळे मी हिंदीत बोलणार नाही, असे हिंदी वाहिनीच्या एका महिला प्रतिनिधीला त्यांनी ठासून सांगत आपले मराठी भाषेवरील प्रेम पुन्हा व्यक्त केले....  असे बातमीत म्हटले आहे.

... हिंदी वाहिनीच्या एका महिला प्रतिनिधीला त्यांनी हिंदीमध्ये बाईट्‌स देण्यास नकार दिला. कारण हिंदी चित्रपट तसेच मालिकांत प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चनपासून ते संजय दत्तपर्यंत काम करणाऱ्या महेश मांजरेकर यांनी अशा प्रकारे नकार दिल्यामुळे हिंदी वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी आश्‍चर्य व्यक्त केले. मुंबईत राहणाऱ्याला मराठी यायलाच हवे, मी मराठी आहे आणि मराठीतच बोलणार, अशी भूमिका त्यांनी घेतली.... अशी माहिती बातमीत पुढे दिलेली आहे.