संस्कृतात बायकोच्या भावाला 'श्यालक' म्हणतात असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते. 
(कुठल्यातरी संस्कृत नाटकात)

गीतेत अर्जुनविषादयोगात 'श्यालः' हा शब्द आला आहे. 'श्याल/श्यालक' एकच की वेगळे हे शोधलं पाहिजे. पण बहुदा एकच असावेत.

अमरकोशात ' श्याला: स्युर्भ्रातरः पत्न्या:' असे आहे. = पत्नीच्या भावाला 'श्याल' म्हणतात.

'साला' हा शब्द त्यावरूनच आला असावा.