तसेच वाटते. कदाचित 'सवाई' शब्दाच्या (योग्यतासूचक अशा ) वापरामुळे सुधीर सरांचा गोंधळ झाला असावा.

दुसरे म्हणजे आपला मुद्दा : माधवराव (पहिले) यांनी पानिपतानंतर राज्यभार समर्थपणे सांभाळला, हे तर खरेच. पण त्याहीपेक्षा रामशास्त्री प्रभुणे, बापू गोखले ( शेवटच्या बाजीराव पेशव्याला जबाबदारीची जाणीव करून देणारे मराठ्यांचे शेवटचे सरसेनापती) अशी कितीतरी चांगली चांगली माणसे त्यांच्या कारकिर्दीत तयार झाली. नारायण रावांना गारद्यांच्या हातून वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःचा बळी देणारे चापाजी टिळेकर या नावाचे वृद्ध गृहस्थ (जे पेशव्यांचे खिदमदगार= म्हणजे हलकी सलकी कामे करणारे सामान्य दर्जाचे नोकर ) ही देखील माधवराव पेशव्यांची निवड होती. ज्या काळात अनेक पत्नित्वाची चाल रूढ होती, त्या काळात एकपत्नित्वाचे व्रत सांभाळणारे हे पेशवे खरोखर वेगळे होते.

स्वामी ही काल्पनिक कादंबरी आहे, पण तरीही त्यातील "राज्याचा स्वामी उपभोगशुन्य असतो' हे शब्द किंवा " ना विष्णू: पृथ्विपतिः " अशा स्वरुपाची एक ओळ मला खासच वाटली.

असो.