विनायकपंत,

राम गांगुलींबद्दल असाच काहीसा किस्सा मीही लहानपणी वाचला होता (फक्त लता मंगेशकरचं नाव त्यात नव्हतं. ). मला वाटतं 'बरसात में'ची चाल शंकर-जयकिशननं राज कपूरला ऐकवली आणि ती त्याला जास्त आवडली असं काहीसं वाचलं होतं.

दिलीप सेन-समीर सेन पासून तानसेन पर्यंतचं नातं मस्तच. यांपैकी दिलीप-समीर यांना आईना हा चित्रपट सोडला तर काही फारसं यश मिळालं नाही.

विशाल हा मात्र अलीकडच्या चांगल्या संगीतकारांपैकी म्हणायला हरकत नाही. 'माचिस'चं संगीत (पानी पानी रे, छोड आए हम) तर हृदयनाथांची आठवण करून देणारं वाटलं होतं.

अन्नू मलिकची बरेच जण सरदार मलिकांचा मुलगा (एवढीच! ) ओळख करून देतात. त्याच्यावर चौर्याचेही अनेक आरोप झालेत. पण बदलत्या काळाबरोबर संगीत बदलणं ही एक कला त्याच्यात आहे आणि त्यासाठी मला तो आवडतो. त्यानं ऐशीच्या दशकात एल. पी. सारखं (उदा. आवारगी), नव्वदीत नदीम-श्रवणच्या काळात त्यांच्यासारखं (उदा. बाजीगर), अलीकडे अजून नवीन पद्धतीनं (उदा. मै हूं ना मधली सोनू निगमची कव्वाली - तुमसे मिलके दिल का ) असं संगीत दिलं. त्याच बरोबर रेफ्युजी, करीब यांना स्वतःच्या शैलीतही चांगलं संगीत दिलं.