यश आणि अपयश यांत मला वाटतं अगदी थोडं अंतर असतं. हेच जर भारत जिंकलं असतं तर आपण म्हटलं असतं का? राहुल द्रविडनं एक बाजू टिकवायची आणि इतरांनी धावा वाढवायच्या ही आपली रणनीती होती. गंभीर आणि रैना तसे खेळलेही. पण खेळच आहे तो, त्या एका सामन्यात आपण थोडे कमी पडलो.

राहुल द्रविडच्या काही मर्यादा आहेत; धोनीचा उदय झाल्यापासून (विशेषतः यष्टीरक्षक फलंदाजाची जागा गेल्यापासून) त्याचं एकदिवसीय क्रिकेटमधलं स्थान डळमळीत झालं. हे असूनही त्यानं आपला कधीही 'संजय मांजरेकर' होऊ दिला नाही हे मला कौतुकास्पद वाटतं.

- कुमार