Sound of Mind येथे हे वाचायला मिळाले:

निकेतच्या घराच्या भल्यामोठ्या खिडकीतून सुंदर झाडी दिसते. समोरच्या बाजूला एका कंपनीचं भलं मोठं आवार आहे, आणि तिथेही जागेच्या विपुलतेमुळे हिरवळ आणि भली मोठी झाडी आहे. अशा रस्त्यावरून फेरफटका मारायला कोणाला आवडणार नाही बरें? त्यात आणखी चाकलेट, आइसक्रिम वगैरे मोहमयी वस्तूंच्या सहवासात असताना तर हे फ़िरणं एक कर्तव्यच ठरत नाही का आपलें? तर असो.
तर सुप्रभाती म्हणजे सकाळी सात साडे सातच्या सुमारास मी आणि विलास घराबाहेर पडतो. जिना उतरून खाली आलं की थोडी बाग आहे. एक फ़ाटक आहे (ते आतल्या बाजूने तुम्ही उघडू शकता, पण बाहेरून आत येताना मात्र ठरलेले आकडे ...
पुढे वाचा. : आमचं फिरणं