माझं इंद्रधनुष्य येथे हे वाचायला मिळाले:
मागच्या आठवड्यात नेहमीप्रमाणे सुपरमार्केटमध्ये गेले होते. (मी आजकाल सग्गळी खरेदी फक्त सुपरमार्केटमधूनच करते हे मला प्रामुख्याने सांगायचं होतं हे सूज्ञ वाचकांच्या लगेच लक्षात आलंच असेल.) मला ही सुपर, हायपर वगैरे मार्केट्स आवडतात ती केवळ तिथल्या वातानुकूलित हवेमुळे. त्या हवेची करणी अशी की सुरुवातीसुरुवातीला एक बास्केट घेऊन आत शिरणारी आणि त्या बास्केटमध्ये मावतील इतक्याच वस्तू विकत घेणारी मी आताशा ‘शॉपिंग कार्ट’ घेऊन आत शिरते. काही वर्षांपूर्वी मला जर कुणी असं सांगितलं असतं की एक दिवस असा येईल की उकाडा आणि घामाच्या चिकचिकाटापासून दूर अशा ...