लेख उत्तम आहे. सचिनच्या पाठिराख्यांना आवडणार नाही.
रवी शास्त्री नावाच्या, आजकाल चटपटीत इंग्रजीमध्ये समालोचन करणाऱ्या, प्राण्याला फलंदाजी करताना पाहिलेय कधी? हे पाप ज्या सुनील गावस्करने सगळ्या भारतीय प्रेक्षकांच्या माथी मारले त्या गावस्करने पहिल्या वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यामध्ये संपूर्ण ६० ओव्हर्स खेळून फक्त नाबाद ३६ धावा काढल्या होत्या. परिणामी इंग्लंडच्या ४ बाद ३३४ धावांना आपले चोख उत्तर ३ बाद १३२ चे. ते सुद्धा गुंडाप्पा विश्वनाथने ५९ चेंडूत झटपट ३७ धावा केल्या म्हणून. १९९६ च्या वर्ल्डकपमधली पाकिस्तानविरुद्धची एकमेव खेळी सोडली तर अजय जाडेजाने काय दिवे लावले?
खरे तर आता द्रविड आणि तेंडुलकर यांना रिटायर करायची वेळ आली आहे. त्या एका बाबतीत मात्र सुनील गावस्करचे कौतुक वाटते. फॉर्म कायम असतानाच रिटायर झाला. प्रेक्षकांचा अंत पाहिला नाही.
विनायक
(काही भाग संपादित : प्रशासक)