दुरूनही मजला दिसते या
पृथ्वीवरची सगळी सृष्टी!
मुबलक सारे असूनही का
तिथली दुनिया दु:खी-कष्टी?

काही लोकांनाच मिळावा
इथे यायचा परवाना
कुणी कुणी यायचे इथे हे
मला विचारून ठरवा ना!

वा!
तुमच्याबरोबर मलाही न्या बरं!