माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:
२००४ ते २००६ मी फ़िरतीची नोकरी केली. फ़िरतीची म्हणजे अगदी १००% प्रवास...रविवार संध्याकाळ किंवा सोमवारी पहाटे निघुन आठवडाभर क्लायन्टकडे काम करुन मग गुरुवारी किंवा शुक्रवारी विकेन्डसाठी घरी. सुरुवातीला वाटलं होतं की काय आपण आपलं खाजगी आयुष्य सोडुन भटकतोय. पण नंतर तशी सवय झाली. मला तशी स्वयंपाकघरात गती नव्हती. आता काय पळ काढायला निमित्त होतं. शिवाय प्रत्येक नव्या प्रोजेक्टला नवी जागा, नवे सहकारी आणि नवी लोकल रेस्टॊरन्ट्स. शिवाय हॉटेल मधली रुम सर्विसने आवरलेली खोली त्यामुळे तिथेही काम नाही. घरी आल्यावर कधीकधी इतका पसारा वाटायचा. पण तरी घरी ...