गुंतवणुक करायची असेल तर बेंकेत जावे आणि फिक्सड डिपोजिट ठेवावे. पण विमा कंपनीकडून गुंतवणुकिची अपेक्षा ठेवणे मुर्खपणा. कारण त्यावर १२.५% सेवा शुल्क आकारले जाते आय करात सुट सुद्धा सेवा शुल्क वगळुन वजावट घेतली जाते. तसेच मुचुअल फंड सुद्धा निव्वळ मुचुअल फंड कंपनिमार्फत घ्यावे कारण प्रथम ३ वर्ष विमा कंपनिचे मुचुअल फंड विकू शकत नाहि.

मुळात ज्या दुकानात जे मिळते ते घ्यावे. दुधाच्या दुकानात चहा (पावडर) घेउ नये; दुधच घ्यावे. जपानमध्ये बँकेच्या फिक्स्ड डिपोजिट वर फक्त ०.८% व्याज मिळते पण तरिही तेथिल सुजाण नागरिक कौटुंबिक बचत हि केवळ फिक्स्ड डिपोजिट मध्येच गुंतवणुक करतात. कारण कौटुंबिक बचत हि १००% सुरक्षीत असली पाहिजे. त्याचे सन्वर्धन होणे हे गौण आहे. पण आपण इथेच तर फसतो आणि बळी जातो.