मिलिंद,
गुरुदत्तचा न्यूयॉर्क महोत्सवात गौरव केला जातोय ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. फार छान वाटलं.
हल्लीच देव-आनंदचं आत्मचरित्र वाचलं. त्यात त्यानं त्यांचे दोघांचे पुण्यातले (उमेदवारीच्या काळातले) दिवस, त्यांची मैत्री, पुढे एक-मेकांबरोबर केलेले चित्रपट याबद्दल सुंदर वर्णन केलंय.
'दुर्दैवाने आजही आपल्या देशात फिरंग्यांचे सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय एखाद्याची थोरवी मान्य केली जात नाही.'
अहो हे आपल्या देशातच आहे असं नाही! एकदा जर्मनीतल्या एका वायनरीत (बघायला) जाण्याचा योग आला होता. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वाइन्स होत्या. त्यांची नावं जर्मन होती; फक्त एकच नाव फ्रेंच होतं आणि ती वाइन सर्वांत महाग होती. मी असं का असं त्या जर्मन माणसाला विचारल्यावर तो म्हणाला होता की जर्मनीतच बनवलेली वाइन जेव्हा फ्रेंच म्हणून तो विकतो, तेव्हा ती अधिक खपते! थोडक्यात, थोरवी मिळवण्यासाठी त्यालाही फ्रेंच नावाचा आधार त्याच्याच देशात घ्यावा लागला!
- कुमार