प्रीति,
लेख आवडला. वातानुकूलित वातावरणात फळ-भाज्या घेता येणं मलाही आवडतं. तुम्ही हे बिनधास्तपणे (परकीय आक्रमणं इ. इ. चा बाऊ न करता) लिहिल्याबद्दल अभिनंदन!
'विरंगुळा सापडला - भारत आणि चीनच्या तुलनेचा!' - तुलना आवडली. ‘ओडोमॉस मस्किटो रिपेलंट’ - मस्तच.
मीही चीनला कधी गेलो नाहीये. पूर्वीच्या कंपनीतल्या चीनच्या लोकांशी व्यवहार केले होते. (ते खास सिंधी, मारवाडी, गुजराथी आणि इतर अनेक मुरलेले धंदेवाईक यांचे व्यापारगुण एकत्र करून एका पारड्यात टाकून त्यांच्याशी चिन्यांची तुलना करावी असं वाटायला लावणारे होते. )
चीनमधली खेडेगावं आणि भारतातली खेडेगावं यांत फारसा फरक नसावा असं मात्र मला उगाचच वाटत आलं आहे. 'गुड अर्थ' हे पर्ल बकचं पुस्तक आणि आपल्याकडचं शेतकऱ्याचं जीवन / जमिनदारी इ. यात फारसा फरक वाटत नाही.
एका सिंगापूरच्या चिनी मित्राला दादर/कबुतरखाना/विसावाच्या भागातल्या बाजारात हापूस आंबे घेऊन द्यायला गेलो होतो. त्याच दिवशी त्याला वांद्रे/वरळी समुद्रपूलही दाखवला होता (तेव्हा बांधकाम चालू होतं - २००६ मधे.) दादरच्या त्या बाजारातली गर्दी बघून 'लूक्स लाइक शांघाय' आणि वांद्र्याच्या पुलापलीकडे दिसणाऱ्या उंच इमारती बघून 'सिमिलर टू सिंगापूर' असं तो म्हणाला होता. त्यामुळे मला पु. लं. चं वाक्य तेवढ्यापुरतं विसरून मुंबईचा अभिमान वाटला होता!
हा माझा सिंगापूरचा मित्र कोण चिनी, कोण जपानी आणि कोण कोरियन हे बिनचूक ओळखायचा. मला याचं फार आश्चर्य वाटलं होतं.
- कुमार