(१) या दोन्हीमधे, शेअर मार्केटशी संबधित गुंतवणुकीच्या योजनांचा विचार केला तर म. फ. जास्त चांगला असं मला वाटतं कारण तो जास्त पारदर्शक असतो. त्यावर 'एंट्री लोड' हेही मला वाटतं हल्ली रद्द केलंय/एजंटतर्फे घेतलं तर जास्तीत जास्त २.५% असतं.

(२) डी. एन. ए. मध्ये याबद्दल काही उत्तम लेख प्रसिद्ध होतात / झाले आहेत. (लेखक - संदीप शानभाग, विवेक कौल इ.. )

दुवा क्र. १

दुवा क्र. २

दुवा क्र. ३

 (३) साध्या आयुर्विम्याबद्दल-

आयुर्विमा घ्यायचा तर 'अनमोल जीवन' ही योजना खूप चांगली आहे. (मी कुठलाही एजंट नाही. ) हिच्यात 'रिटर्न्स' काही मिळत नाहीत; पण इतर 'रिटर्न्स' देणाऱ्या योजनांच्या तुलनेत 'प्रीमियम' बघितलात, तर तुमच्या लक्षात येईल.

उदा. १ लाखाची जीवन आनंद/ मनी बॅक पॉलिसी घेण्यासाठी प्रीमियम लागतो ५००० रु. आणि तुम्हांला साधारणपणे जास्तीत जास्त ३ लाखांपर्यंत (१ लाख मरणानंतर जीवन आनंदमध्ये) मिळतात.

याउलट १ लाखासाठी अनमोल जीवनमध्ये ५०० रु. प्रीमियम लागतो. हे पैसे (आपण जिवंत राहिल्यास) बुडतात; पण उरलेले साडेचार हजार आपण अगदी पी पी एफ मध्ये गुंतवले तरी इतर पॉलिसीजपेक्षा जास्त रिटर्न्स मिळतात. (कुठलीही पॉलिसी पी. पी. एफ. पेक्षा जास्त गॅरंटीड रिटर्न्स देत नाही. )

मी दोन वर्षं जीवन आनंदमध्ये पैसे भरूनही नंतर ती या कारणासाठी बंद केली.

- कुमार